२१ वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरस्नेहालय पुनर्वसन संकुल

२१ वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरस्नेह

 *सेवांकुर-२०१७ *
 *२१ वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरस्नेहालय पुनर्वसन संकुल, एम.आय.डी.सी,
 अहमदनगर (११-१२-१३ ऑगस्ट)*
आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची ईच्छा असते. स्वत:साठी
 जगतांना इतरांसाठी/समाजासाठीही थोडं जगावं, आपले आयुष्य सेवेच्या
 परीसस्पर्शाने आशयसंपन्न करावे, असंही वाटते. परंतु अनेकदा दिशाच सापडत नाही.
  योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशा प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी १०
 वर्षांपूर्वी सेवांकुर या तरुणासाठीच्या खुल्या मंचाची सुरुवात बाबा
 आमटेंच्या  आनंदवनात डॉ. अविनाश सावजी व अन्य समविचारी मित्रांच्या पुढाकारातून झाली.
 आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सेवांकुरची २० प्रेरणा शिबिरे झालीत.
 या शिबिरांमधून प्रेरणा घेतलेले अनेक तरुण आपल्या आयुष्यात काही वेगळे करताना   आज दिसतात. शिवाय त्यांच्यामुळे इतर अनेकांची आयुष्ये पण बदलल्याचे दिसून  येते.
  *सेवांकुर २०१७ शिबिरात का यावे ?* आपले स्वतःच्या आयुष्यात स्वप्ने कशी
 पाहावीत व पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात कशी आणावीत हे समजून घेण्यासाठी.
 आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व दूरगामी परिणाम करणारे निर्णय विचारपूर्वक व
 पूर्ण भान ठेऊन कसे घ्यावेत याबाबत स्पष्टता येण्यासाठी. आपल्या आयुष्यात
 ज्यांनी काहीतरी विशेष व वेगळे केलेले आहे अशा अनेक ज्येष्ठ मित्रांचे अनुभव
 ऐकण्यासाठी, त्यांच्या सहवासात काही क्षण घालविण्यासाठी, त्यांचे प्रयत्न,
 प्रेरणा, अडचणी, यश-अपयशांचे क्षण, वाटचाल, त्यांना आलेले कडू-गोड अनुभव
 ऐकण्यासाठी व त्याद्वारे आपली बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी, राज्यभरातील
 समविचारी मित्रांची साखळी जोडण्यासाठी. तुमच्यापैकी पण अनेकांनी काही स्वप्ने
  पाहिली असतील व त्या दिशेने काही कृती केलेली असेल तर त्या अनुभवांचे
 शेअरिंग  करण्यासाठी.
Read Full

Leave a Reply